आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट
एबीपी माझा वेब टीम | 25 Feb 2019 07:57 PM (IST)
1
मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची आज पासून यात्रेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातील लाखो भाविक देवीचे दर्शन करण्यासाठी अंगणेवाडीत दाखल झाले आहेत.
2
3
सध्या मंदिरात भजन आणि मंत्रोचाराने मंदिर परिसर अधिकच भक्तिमय झालाय.
4
5
6
आकर्षक रोषणाईनं भराडीदेवीचं मंदिर उजळून निघालं आहे . देवीचं मंदिर फुलांनी सजविले आहे. ही यात्रा दिड दिवसांची असून 9 लाखाहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी अंगणेवाडीला येतात.
7
नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी म्हणून भराडीदेवीची ख्याती आहे.
8
नवसाला पावणारी देवी असल्याने सामान्यांबरोबर राजकीय व्यक्तीचीही इथे रेलचेल असते.
9
या यात्रेचं विशेष म्हणजे भराडीदेवीच्या यात्रेची तारीख कोणत्याही कॅलेंडर किंवा पंचांगात सापडत नाही. देवीला कौल लावून यात्रेची तारीख ठरवली जाते.