✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

माकडांमुळे आढळलेली तिकोना गडावरील गुहा आतून कशी दिसते?

एबीपी माझा वेब टीम   |  03 Oct 2018 08:22 AM (IST)
1

2

गडाच्या पायथ्याशी राहून पर्यटकांसाठी चहा नाश्त्याचा व्यवसाय करणाऱ्या गुरुदास मोहळ, हा आपलं दुकान मांडून बसला होता. मात्र त्याचं साहित्य माकडांनी पळवून नेलं. गुरुदासने मग माकडांचा पाठलाग केला. माकडं ज्या ठिकाणी गेली ती एक गुहा होती. गडाची इतंभूत माहिती असलेल्या गुरुदास मोहळला ही गुहा प्रथमच दिसली होती. त्याने दुर्गप्रेमींना ही माहिती दिल्यानंतर ही पुरातन गुहा समोर आली.

3

सह्याद्रीच्या पर्वत रांगात वसलेला, समुद्र सपाटीपासून साडे तीन हजार फूट उंचीवर असलेला, त्रिकोणी आकारातला तिकोना गड. पुण्यातील निसर्गाने नटलेल्या लोणावळा आणि तुंग गडालगतचं विलोभनीय दृश्य तिकोना गडाच्या सौंदर्याची साक्ष देतं. त्यातच गडावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर असल्यानं इथे भक्तीची सादही घेता येते. त्यातच आता भर पडली आहे ती एका प्राचीन गुहेची. शेकडो वर्षांपासून नजरेआड असलेली ही गुहा समोर येण्याला माकडं कारणीभूत ठरली आहेत.

4

5

गुहेत प्रवेश करताच मोठ्या प्रमाणात इथे खापरांचे तुकडे आढळले. तर उजव्या बाजूस अजून एक छोटी गुहा दिसली. तिच्या आत जायला, खूपच छोटा मार्ग आहे. त्यामुळं तिथं झोपूनच प्रवेश करता येऊ शकतो. या छोट्या गुहेत इतिहासाची साक्ष देणारा ठेवा असू शकतो.

6

7

8

9

10

या गडकोटांमध्ये अजूनही असे रहस्य उलगडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या दरीच्या उतारावर आढळलेल्या या मोठ्या गुहेचा इतिहासात कशासाठी वापर केला जात असावा? त्यातील खापरे कोणत्या युगातील असावीत? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तज्ज्ञाच्या शोधात याचा सुगावा लागेलच, पण हा ठेवा जपण्यासाठी याचं संवर्धन होणं तितकंच महत्वाचं आहे.

11

गडाच्या कातळकडेवरील हा ठेवा जनतेसमोर आणण्यासाठी दिनेश बोडके थेट ड्रोन घेऊन गडावर दाखल झाला, मग दुर्गप्रेमींनी अवघड चढण सर केली. तिथं पोहोचताच गुहेत प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग असल्याचं दिसलं.

12

पुण्याच्या तिकोना गडावर एक प्राचीन गुहा आढळली आहे. शेकडो वर्षांपासून नजरेआड असलेली ही गुहा माकडांमुळे नजरेस पडली. या गुहेत इतिहासाची साक्ष देणारा ठेवा असण्याची शक्यता दुर्ग प्रेमी व्यक्त करत आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • माकडांमुळे आढळलेली तिकोना गडावरील गुहा आतून कशी दिसते?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.