व्यंगचित्रातून राज ठाकरेंच्या बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन यांच्यासह बच्चन कुटुंब मालदीवला गेलं आहे. बिग बींच्या लाखो चाहत्यांकडून जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.
अमिताभ बच्चन बच्चन वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासह मालदीवला गेले आहेत.
वयाच्या 75 व्या वर्षीही रुपेरी पडद्यावर तितक्याच सशक्तपणे नायकाच्या भूमिकेत वावरणारा आणि प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरणारा हा रुपेरी पडद्यावरचा अनभिषिक्त सम्राट आजही सिनेसृष्टीत तेवढाच सक्रिय आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये त्यांना बिग बी, शहंशाह अशा अनेक नावांनी ओळखलं जातं.
1970 ते 2017 या काळातील विविध टप्प्यावरील बिग बींचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी शेअर केले आहेत. शिवाय फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी बिग बींसोबतच्या आठवणींना उजाळाही दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून बिग बी अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.