अमिताभ बच्चन यांची संपत्ती किती?
बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज 75 वा वाढदिवस. बॉलिवूडचा शहनशहा, बिग बी, महानायक अशी अनेक बिरुदं मानाने मिरवणारा हा बॉलिवूडचा बाप..वयाच्या 75 व्या वर्षीही रुपेरी पडद्यावर तितक्याच सशक्तपणे नायकाच्या भूमिकेत वावरणारा आणि प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरणारा हा रुपेरी पडद्यावरचा अनभिषिक्त सम्राट.
फोर्ब्जच्या ताज्या आकडेवारीनुसार अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 2800 कोटींच्या घरात आहे.
अमिताभ बच्चन यांच्या ताफ्यात 15 गाड्या आहेत. त्यात 9 कोटींची रोल्स रॉईस, साडेचार कोटींची बेंटले, दीड कोटींची पोर्शे अशा अलिशान कार्सचा समावेश आहे.
अमिताभ बच्चन यांचे मुंबईत पाच अलिशान बंगले आहेत. त्यातल्या फक्त जलसा आणि प्रतीक्षा बंगल्यांचीच किंमत 200 कोटींहून अधिक आहे.
कौन बनेगा करोडपती हा शो अमिताभ बच्चन यांच्या करीयरमधला महत्वाचा टप्पा. पडत्या काळाता या शोने त्यांना चांगली साथ दिली. या शोसाठी अमिताभ यांचं एका दिवसाचं मानधन आहे तीन कोटी रुपये. PHOTO: Twitter
एका सिनेमासाठी अमिताभ बच्चन तब्बल 20 कोटी रुपये मानधन म्हणून घेतात. वयाच्या पंचाहत्तरीतसुद्धा त्यांचा भाव अजिबात कमी झालेला नाही. PHOTO: Twitter
अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमे केले आहेत. PHOTO: Twitter
जलसा हे बंगला अमिताभ यांना गिफ्ट म्हणून मिळाला होता. रमेश सिप्पी यांनी हे महागडं गिफ्ट अमिताभना दिलं होतं.