जगातील सर्वात महागडं घर, मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया'चे खास फोटो
अँटिलियाचं डिझाइन शिकागोमधील आर्किटेक्ट 'पर्किन्स'नं तयार केलं आहे. तर याचं कंस्ट्रक्शन ऑस्ट्रेलियन कंपनी 'लँग्टोंन होल्डिंग'नं केलं आहे.
अँटिलियामध्ये 27 मजले आहेत. 8 रिश्टर स्केल भूंकपाचा धक्का देखील ही इमारत सहन करु शकतो.
अँटिलियामध्ये एक सुंदर हँगिंग गार्डन देखील तयार करण्यात आलं आहे.
अँटिलियामध्ये 9 लिफ्ट, 1 स्पा, 1 मंदिर तसेच सोन्याची नक्षी, काचा यापासून एक सुंदर असं बॉलरुम तयार करण्यात आलं आहे. याशिवाय एक खासगी सिनेमा हॉल, योगा स्टुडिओ, एक आईस्क्रीम रुम ३ पेक्षा जास्त स्विमिंग पूल आहेत
अँटिलियावर तब्बल 3 हेलिपॅड आहेत. हे एकमेव घर आहे की, जिथे तीन हेलिपॅड आहेत.
अटलांटिक महासागरातील एका पौराणिक बेटावरुन या घराचं नाव अँटिलिया ठेवण्यात आलं आहे.
अँटिलियाचे सहा मजले केवळ पार्किंग आणि गॅरेजसाठी आरक्षित आहे.
अँटिलियामध्ये जवळजवळ 600 कर्मचारी काम करतात.
या घरात सिनेमागृह, जिम, बॉलरुम देखील आहे.
21.1 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक मुकेश अंबानींनचं हे घर एक राजमहालच आहे.
फोर्ब्सच्या मते, या घराची किंमत जवळजवळ 6000 कोटी आहे. तर डॉलरमध्ये याची किंमत 2 बिलियन डॉलर (जवळजवळ 125 अब्ज रुपये ) एवढी आहे. तसंच ही इमारत उभारण्यास तब्बल 11000 कोटी रु. खर्च आला होता.
ही गगनचुंबी इमारतीत सर्व अत्याधुनिक सुख सुविधांनी सज्ज आहे.
'अँटिलिया' दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर आहे.
फोर्ब्स मासिकानं काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या नावाची घोषणा केली होती. ज्यामध्ये मुकेश अंबानी यांचा पहिल्या पन्नास जणांमध्ये क्रमांक लागतो. याच मुकेश अंबानींचं घर 'अँटिलिया' हे जगातील महागड्या घरांपैकी एक आहे. पाहा या घराचे खास फोटो