साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत ब्लॅक साडीमध्ये दिसली बॉलिवूड अभिनेत्री तब्बू, व्हायरल होत आहेत फोटो
चित्रपट 12 जानेवारीला रिलीज होणार आहे. 'अला वैकुंठपुरमलो'मधून तब्बू एक दशकाहून जास्त वेळाने तेलगू चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
आपल्या परफॉर्मन्सनंतर ते म्हणाले की, 'गाण्यासाठी थमन सरांचे आभार, अल्लू सर मी तुमचा मोठा फॅन आहे.'
इव्हेंटमध्ये संगीतकार थमन एस सहित फिल्मची टिम सोमवारी या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. बॉलिवूडमध्ये एक चर्चित नाव अरमानने 'बुट्टा बोम्मा' गायलं.
त्रिविक्रम श्रीनिवास द्वारे दिग्दर्शित 'अला वैकुंठपुरमलो'ने आधीच 'समाजावारगमना', 'रामुलु रामुला' आणि 'ओएमजी डॅडी' आपल्या या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
हा इव्हेंट साऊथ इंडियाचा सर्वात मोठा म्युझिकल नाइट इव्हेंट होता. ज्यामध्ये जवळपास 50 संगीत कलाकार जसं अरमान मलिक आणि शिवमणिने स्टेजवर आपल्या परफॉर्मन्सने चार चांद लावले.
अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री तब्बूने आपला आगामी तेलगू चित्रपट 'अला वैकुंठपुरमलो'चं म्युझिक प्रमोट केलं.