टायगर श्रॉफचं या अभिनेत्रीसोबत डेटिंग
टायगरसोबतच्या कथित अफेअरमुळे दिशा चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनेता टायगर श्रॉफ बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असलेल्या एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे.
टायगर आणि दिशा यांच्या अफेअरची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
दिशा 2013 साली मिस इंडिया रनर-अप राहिलेली आहे.
बागी या टायगर श्रॉफच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमात टायगरची सहअभिनेत्री म्हणून दिशाचं नाव चर्चेत होतं. मात्र या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली.
दिशा मिस इंडिया रनर-अप असून एक प्रसिद्ध मॉडेलसुद्धा आहे.
दिशा पाटणी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर बनलेला चित्रपट 'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून दिशा पदार्पण करत आहे.
'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिशा दिसणार असल्याची चर्चा आहे.