बिग बॉसचे आजवरचे सर्व विजेते
ज्येष्ठ अभिनेते दारा सिंह यांचे पुत्र अभिनेता विंदु दारा सिंह यांने बिग बॉस 3 या पर्वाचा किताब आपल्या नावे केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआशुतोष कौशिक हा बिग बॉस पर्व दोनचा विजेता ठरला होता. त्यापूर्वी त्याने रोडीजचंही विजेतेपद पटकावलं होतं. त्याने जिला गाजियाबाद, शॉर्टकट रोमियो या चित्रपटात देखील त्याने अभिनय केला होता.
कसोटी जिंदगी की या मालिकेतील कोमोलिकाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळवणारी टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया रिअॅलिटी शो बिग बॉस च्या सहाव्या पर्वाची विजेती ठरली होती. तर इमाम सिद्दीकी याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होत.
मनवीर गुर्जर हा बिग बॉस 10 पर्वाचा विजेता ठरला होता. मनवीर हा कॉमनर (सामान्य व्यक्ती ) म्हणून बिग बॉसमध्ये आला होता. त्यानंतर तो खतरो के खिलाडी मध्येही दिसला होता. सध्या तो सिने सृष्ठीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.
टीव्ही मालिका दिया और बाती हमचा मुख्य व्यक्तीरेखा साकारणाऱ्या गौतम गुलाटी याने बिग बॉस 8 चं विजेतापद आपल्या नावावर केलं होतं. सलमान खान आणि फराह खान या दोघांनी या पर्वाच सुत्रसंचालन केलं होत.
मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वाची विजेती ठरली होती. तनिशा मुखर्जीने पर्वात दुसरं स्थान पटकावलं होतं. तर एजाज खानला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं.
टेलिव्हिजनची स्टार असलेली दीपिका कक्कर इब्राहिम बिग बॉसच्या 12व्या सीझनची विजेती ठरली आहे. तर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीशांत उपविजेता ठरला. 'ससुराल सिमर का' या मालिकेतली 'सिमर' ची दीपिकाने केलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली होती
आशिकी चित्रपट फेम अभिनेता राहुल रॉय हा बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर त्याने टु बी या नॉट टु बी या चित्रपटात आपलं नशिब आजमावलं होत. मात्र हा चित्रपट फारसा चालला नाही.
अभिनेत्री शिल्पा शिंदेने 'बिग बॉस 11'चं विजेतेपद पटकावलं होत. प्रत्येक सीझनप्रमाणे बिग बॉसचं 11वं पर्वही अनेक वादांमुळे गाजलं होतं. हीना खान, विकास गुप्ता, पुनिश शर्मा यांना टक्कर देणाऱ्या शिल्पाच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली होती.
कसोटी जिंदगी की या मालिकेतून पर्दापण करणाऱ्या श्वेता तिवारी ही बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची विजेती ठरली होती. त्यानंतर ती परवरिश, झलक दिखलाजा आणि बेगुसराय या मालिकेतून दिसली होती.
रोडीज विजेता प्रिंस नरुला याने बिग बॉस 9 चा खिताब पटकावला होता. तो स्प्लिट्सव्हिला या रिअॅलिटी शोचाही विजेता होता. नंतर त्याने टीव्ही मालिकेत प्रवेश केला.
कुमकुम म्हणून घराघरात पोहोचणारी जुही परमार ही बिग बॉस 5 ची विजेती ठरली होती. सध्या जुही शनिदेव या मालिकेत शनिदेवाच्या आईची भूमिका करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -