Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लढाऊ विमानांचं लखनौ-आग्रा एक्सप्रेस वेवर लॅण्डिंग
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपत्कालीन परिस्थितीत लढाऊ विमानांना लँडिंगसाठी रनवे उपलब्ध नसल्यास लखनौ-आग्रा हायवेवर विमानांना लँडिंग करता यावं, यासाठी हा रनवे तयार करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी हवाईदलाच्या आठ लढाऊ विमानांनी इथून टेक ऑफ केलं होतं.
फक्त भारतच नाही, तर पाकनेही 2000 मध्ये अशा प्रकारचं ड्रिल केलं होतं. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, चीन, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशांनीही हा युद्धाभ्यास केला आहे.
आधुनिक युद्धशास्त्रात लढाऊ विमानांना लँडिंग ग्राऊंड म्हणून एक्स्प्रेस वे आणि हायवे वापरण्यास तयार केलं जातं.
1965 साली झालेल्या युद्धात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बॉम्ब टाकून भारताच्या एअरबेसची नासधूस केली होती. त्यामुळे भारतीय वायुसेनेला ऑपरेशन करताना अडचणी आल्या.
युद्धस्थितीत रनवेचं नुकसान झाल्यास शत्रूवर पलटवार करण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची ठरते.
वायुदलाची 20 फायटर विमानं, सुखोई 30, हरक्युलस, जॅग्वार, मिराज आणि मिग यांसारख्या लढाऊ विमानांना महामार्गावर लँड होताना पाहणं, ही पर्वणी ठरत आहे.
लखनौ-आग्रा हायवेवर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी एक-एक करुन लँडिंग केलं.
युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास देशातल्या महामार्गाचा विमानांसाठी रन वे म्हणून वापर व्हावा, यासाठी लखनौ-आग्रा महामार्गावर हवाईदलाची लढाऊ विमानं टच डाऊन म्हणजेच लँडिंग करत टेक ऑफ करत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -