सांगलीच्या कृषीप्रदर्शनात गजाची झलक, सबसे अलग!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारण एरव्ही शेतीभाती न करणारी मंडळीही लायनीत उभं राहून गजाच्या दर्शनाचा लाभ घेत असल्यानं सांगलीच्या तिफन कृषी प्रदर्शनात सध्या फक्त गजाची हवा आहे.
या गजा देशी आणि जर्शीची हायब्रीड पैदास असल्याचे बैलाचे मालक कृष्णा सायमोटे सांगतात.
या महाकाय बैलाची उंची 6 फूट असून, लांबी 10 फूट आहे तर त्याचं वजन तब्बल 1 टन आहे.
गजाचे इतरही काही फोटो
1 टन वजनाचा आणि 6 फूट उंचीच्या गजा नावाच्या या बैलाला पाहायला तुम्हाला 10 रुपये तिकीटही ठेवण्यात आलं आहे. तिकीट काढून आत गेलात की गजाचं दर्शन घेऊन तुमचे डोळे मोठे होतात.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि क्रांतिसिंह नाना पाटील संस्था यांच्यासंयुक्त विद्यमाने सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या 'तिफन' कृषी प्रदर्शनाला सध्या नोटाबंदीचा फटका बसला तरी, या प्रदर्शनातील एका बैलाने चांगलीच गर्दी जमवली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -