लवकरच जगासमोर येणार पहिली हवेत उडणारी कार!
एकावेळी ही कार 875 किमीचा हवेतील प्रवास करु शकते. कंपनीच्या अलाला फोर्ब्स मॅग्जीनच्या रिपोर्टनुसार यावर्षाच्या शेवटी ही कार प्रत्यक्ष बाजारात येईल. सौजन्य: AeroMobil
दोन सीटची असणारी ही कार 200 किमी प्रतितास हवेत उडू शकते. तर 160 प्रतितास वेगानं रस्त्यावर धावू शकते. कारच्या मॉडेलमध्ये देखील बरेच बदल करण्यात आले आहेत.
युरोपीतील स्लोव्हाकिया देशातील AeroMobil कंपनी लवकरच ही कार पेश करणार आहे. 20 एप्रिल 2017 ला मोनेकोमध्ये होणाऱ्या Top Marques Show मध्ये ही कार पहिल्यांदा जगासमोर येणार आहे. ही कार फक्त रस्त्यावर धावणारी नसून ती हवेतही उडते. हवेत ही कार 12.5 प्रति लीटर एवढा अॅव्हरेज देते. कार आणि विमान चालवण्याचा तंत्रज्ञानाचं योग्य मिश्रण करुन ही कार तयार करण्यात आली आहे.
जगभरात ट्राफिक ही मोठी समस्या आहे. त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी गेले अनेक वर्ष शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते. यावर उपाय शोधण्यात यश आलं असून लवकरच हा प्रयोग जगासमोर येणार आहे. चक्क उडणारी कार आता सर्वांच्या भेटीला येणार आहे.