बिझनेसमनशी लगीनगाठ बांधणाऱ्या दहा बॉलिवूड अभिनेत्री
अभिनेत्री उर्वशी शर्माने व्यावसायिक सचिन जोशीसोबत लगीनगाठ बांधली
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बिझनेसमन राज कुंद्रासोबत नोव्हेंबर 2009 मध्ये लग्न केलं.
अभिनेत्री रविना टंडन चित्रपट वितरक अनिल थडानीशी विवाहबद्ध झाली. 2003 मध्ये ओळख झाल्यानंतर वर्षभरात तिने दोनाचे चार हात केले.
माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री जुही चावला व्यावसायिक जय मेहता यांच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकली.
'खल्लास'गर्ल इशा कोप्पीकरने हॉटेलियर टिमी नारंगशी नोव्हेंबर 2009 मध्ये विवाह केला
स्वदेस या एकमेव चित्रपटात झळकलेली अभिनेत्री गायत्री जोशी एका बांधकाम कंपनीचे कार्यकारी संचालक विकास ओबेरॉयशी लग्न केलं.
धर्मेंद्र-हेमा मालिनी यांची कन्या, अभिनेत्री इशा देवल बॉयफ्रेण्ड भरत तख्तानीसोबत 2012 मध्ये विवाहबंधनात अडकली. भरतचा हिऱ्यांचा व्यापार आहे.
अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया दिया मिर्झाने बिझनेस पार्टनर साहिल संघाशी लग्न केलं. नवी दिल्लीत 18 ऑक्टोबर 2014 रोजी लगीनगाठ बांधली
आयेशा टाकियाने हॉटेल व्यावसायिक फरहान आझमीसोबत मार्च 2009 मध्ये निकाह केला. फरहान हा समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांचा मुलगा आहे.
माजी व्हीजे आणि अभिनेत्री अमृता अरोराने बांधकाम व्यावसायिक शकील लडाकसोबत लग्न केलं.