'सिंबा'मध्ये सारावर भारी पडली 'ही' मराठमोळी अभिनेत्री
'सिंबा' चित्रपटात रणवीर सिंह आणि सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असली तर इतर व्यक्तिरेखांनीही छाप पाडली आहे.
तिचा 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या फ्रेश फेस ऑफ द इयरने गौरव करण्यात आला आहे.(फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)
ती 'Clean & Clear'ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडरही होती. शिवाय तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे.(फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)
तिच्या कुटुंबात आई, बाबा आणि भाऊ असे तिघेही वकीलच आहेत.(फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)
मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या वैदेहीने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. (फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)
तिने 'वेड लावी जीवा' नावाच्या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. (फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)
सारा सिनेमाची नायिका असली तर वैदेहीची भूमिका अतिशय सशक्त आणि दमदार आहे. (फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)
चित्रपटात वैदेही रणवीरच्या मानलेल्या बहिणीच्या भूमिकेत आहे. (फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)
वैदेहीने कथकमध्ये मास्टर्सही केलं आहे.(फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)
वैदेहीच्या व्यक्तिरेखेमुळेच रणवीर त्याचा भ्रष्ट आणि चुकीचा मार्ग सोडण्यासाठी प्रवृत्त होतो.(फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)
रणवीर आणि वैदेहीमधील इमोशनल केमिस्ट्री प्रेक्षकांना खिळवून ठेवते.(फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)
आकृतीची व्यक्तिरेखा सिनेमाच्या कथानकाला वेगळं वळण देते.(फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)
वैदेही याआधी आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटात दिसली होती. याशिवाय तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)
त्यापैकीच एक नाव म्हणजे वैदेही परशुरामी. 'सिंबा' चित्रपटात तिने आकृती दवेची दमदार भूमिका साकारली आहे. (फोटो : वैदेही परशुरामी इन्स्टाग्राम अकाऊंट)