'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' लीक... अभिनेत्री उर्वशी ढसाढसा रडली!
दोन दिवसात या सिनेमानं 5 कोटींची कमाई केली आहे.
ऑनलाईन सिनेमा लीक झाल्यानं कमाईवर बराच परिणाम झाला आहे.
बॉक्स ऑफिसवरही 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती'नं म्हणावी तशी कमाई केली नाही.
22 जुलैला प्रदर्शित होणारा हा सिनेमा लीक झाल्यामुळे 15 जुलैलाच प्रदर्शित करण्यात आला.
सिनेमातील इतर कलाकार विवेक ऑबरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी हे देखील नाराज दिसले.
सिनेमा आधीच लीक झाल्यानं उर्वशी खूपच नाराज झाली.
भर पत्रकार परिषदेतच तिला रडू कोसळलं.
अभिनेत्री उर्वशी त्यावेळी ढसाढसा रडली.
अडल्ट कॉमेडी 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' सिनेमाच्या संपूर्ण टीमनं काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना या सिनेमाचे निर्माते आणि कलाकार बरेच उदास दिसले. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या तीन आठवडे आधीच हा सिनेमा ऑनलाइन लीक झाल्यानं बरंच नुकसान झाल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. याचवेळी बोलताना अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला आपले अश्रू रोखता आले नाहीत.