'जय मल्हार' फेम म्हाळसाचा साखरपुडा!

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सुरभी सध्या कलर्स मराठीवरील 'लक्ष्मी सदैव मंगलम्' या मालिकेत काम करत आहे. तिच्यासोबत ओमप्रकाश शिंदे आणि समृद्धी केळकर मुख्य भूमिकेत आहेत.

तसंच लग्नानंतरही मी मालिकांमधून प्रेक्षकांना भेटत राहिन, असंही तिने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
सुरभी पुढच्या वर्षी विवाहबद्ध होणार आहे.
'जय मल्हार' या पौराणिक मालिकेत म्हाळसाच्या भूमिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी हांडेचा साखरपुडा झाला आहे.
दरम्यान, सुरभीचा साखरपुडा झटपट झाला असला तरी लग्नाला अजून अवकाश आहे.
साखरपुड्याबाबत एबीपी माझाशी बोलताना सुरभी म्हणाली की, आम्हा दोघांची आधीपासूनच मैत्री होती. मात्र आमची क्षेत्रं वेगवेगळी आहेत. अनेक विषयांसह आपापल्या क्षेत्राबद्दल आमच्या गप्पा व्हायच्या. त्यामुळे आमचा बॉण्ड आधीपासूनच होता. यानंतर आम्ही घरच्यांना आमच्या नात्याबद्दल सांगितलं. घरच्यांच्या संमतीनंतर साखरपुड्याची तारीख ठरली आणि आमचा साखरपुडा झाला.
जळगावमध्ये रविवारी (26 ऑगस्ट) दुर्गेश कुलकर्णीसोबत तिचा साखरपुडा पार पडला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -