अभिनेत्री रवीना टंडन लवकरच आजी होणार!
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. रवीना लवकरच आजी होणार आहे. वाचून नक्कीच धक्का बसला असेल, पण होय हे खरं आहे.
रवीना वयाच्या 44 व्या वर्षी आजी होणार आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपण आजी होणार असल्याचं जाहीर केलं.
रवीनाच्या लाडक्या लेकीचं बेबी शॉवर अर्थात डोहाळ जेवण नुकतंच पार पाडलं. या सोहळ्याचें फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले.
रवीनाचं 2004 मध्ये म्हणजेच 15 वर्षांपूर्वी चित्रपट वितरक अनिल थडानी यांच्यासोबत लग्न झालं. त्यांना रशा आणि रणबीरवर्धन ही दोन मुलं आहेत.
यातील छाया लवकरच आई होणार आहे. त्यामुळे आता आजी होणार असल्याने रवीना अतिशय आनंदी आहे.
मुलींचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवीनाने त्यांच्यासाठी योग्य स्थळ बघून त्यांचं लग्नही लावून दिलं.
रवीनाने 1995 मध्ये म्हणजेच लग्नापूर्वी छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यावेळी पूजाचं वय 11 आणि छायाचं वय 8 वर्ष होतं.