अभिनेत्री राधिका आपटे बर्थडे स्पेशल!
'शोर इन द सिटी' या सिनेमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारी राधिका प्रायोगिक रंगभूमी, विविध डॉक्युमेंट्रीज, बॉलीवूड सिनेमे आणि आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर राधिका आपली छाप सोडत आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
राधिकाला हिंदी, इंग्रजी, तमीळ, मराठी, तेलुगू, मल्याळम आणि बंगाली या सात भाषा येतात. बॉलिवूडमध्ये सर्वाधिका भाषा येणारी राधिका एकमेव अभिनेत्री आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
अभिनयासोबत शिक्षणातही राधिका मागे नाही. राधिकाने गणित आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
राधिका डान्समध्ये मागे नाही. तिने जाऊन लंडनमध्ये कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
अभिनेता रितेश देशमुखसोबच्या 'लय भारी' या मराठी चित्रपटामधील राधिका तर सगळ्यांची मनं जिंकून गेली. लस्ट स्टोरीज, सॅक्रेड गेम्स, घुल यासारख्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
राधिकाने ठराविक साच्यामध्ये न अडकता, बिनधास्त आणि बोल्ड भूमिका तितक्याच आत्मविश्वासानं साकारत सिनेसृष्टीत आपली वेगळ ओळख निर्माण केली आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडमधील मराठमोळी आभिनेत्री राधिका आपटेचा आज 33वा वाढदिवस आहे. 7 सप्टेंबर 1985मध्ये तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये राधिकाच जन्म झाला. (फोटो- इन्स्टाग्राम)