अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरत लग्नबंधनात अडकणार, लग्नाआधीच्या विधींचे फोटो व्हायरल
नेहाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो पोस्ट केले आहेत.
नेहाने मराठी, हिंदीसह अनेक भाषांमधील सिनेमात काम केलं आहे. बिग बॉस हिंदीमध्येही नेहा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
नवीन वर्षात मराठी पद्धतीने शार्दुल आणि मी लग्न करणार असल्याचं नेहाने सांगितलं.
माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे. माझ्यासोबत असलेल्या सर्वांचे मी आभार मानते ज्यांनी हा क्षण अविस्मरणीय केला.
फोटोंमध्ये नेहा पारंपरिक वेशात सुंदर दिसत आहे. आपल्या लग्नाविषयी सांगताना नेहाने म्हटलं की, मी माझ्या स्वप्नातील राजकुमाराशी लग्न करून नवीन आणि सुंदर कुटुंबात जात आहे.
लग्नाआधी नेहाच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नेहा प्रियकर शार्दुल सिंहशी लग्न करणार आहे.