अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतील पहिलं 'वृक्ष संमेलन'
निसर्गातील गोष्टींचा वापर करुन सह्याद्री देवराई प्रकल्पावर सुशोभीकरण करण्यात आले आहे.
सह्याद्री देवराई प्रकल्पावर सर्व प्रकारची फुलझाडे, फळझाडे लावण्यात आली आहे.
13 व 14 फेब्रुवारीला पालवनच्या देवराई प्रकल्पावर पहिले वृक्ष संमेलन होत आहे.
ओसाड माळरानावर अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने नंदनवन फुलवलं आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
.या वृक्ष दिंडीत सयाजी शिंदे यांच्यासह राज्यभरातील पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, वृक्ष प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची संकल्पना आणि वन विभागाच्या सहकार्याने होत असलेल्या पहिल्या वृक्ष संमेलनाची सुरुवात आज वृक्षदिंडीने झाली.
दोन दिवस चालणाऱ्या या वृक्ष संमेलनाच्या दिवशी आज वृक्षदिंडी काढण्यात आली.
सह्याद्री देवराईचे प्रणेते आणि अभिनेते सयाजी शिंदे आणि दिग्दर्शक व लेखक अरविंद जगताप यांच्या पुढाकाराने हे वृक्ष संमेलन भरत आहेत.
पर्यावरण प्रेमींसाठी अनोखी मेजवाणी असलेल्या या वृक्ष संमेलनास विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींनी यांचा मेळा भरणार आहे.
पर्यावरण आणि निसर्गप्रेमी असेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत हे संमेलन होत आहे.
सह्याद्री देवराई व वनविभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या जगातील पहिल्या वृक्ष संमेलनात मान्यवरांचे वृक्ष, वनस्पती, वन्यजीव यांच्यावर व्याख्याने होणार आहेत.
या दिंडीचा समारोप सामाजिक न्याय भवन परिसरात करण्यात आला.
डोंगरावरील दगडांची आकर्षक ठेवण ही निसर्गप्रेमींना भुरळ घालत आहे.
या वृक्ष संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडाचे झाड असणार आहे.