जितेंद्र यांची गिरगावातील बाप्पाच्या दर्शनाला हजेरी
जितेंद्र यांना नुकतंच राज्य शासनाच्या राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईः बॉलिवूडचे बुजूर्ग अभिनेते जितेंद्र उर्फ रवी कपूर यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या जुन्या घरी अर्थात गिरगावातील श्याम सदनमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं.
'जब तक सांस में सांस हैं, तब तक गिरगाव में आता रहूँगा,' असं वचन जितेंद्र यांनी गिरगावकरांना दिलं.
जितेंद्र यांना गिरगावातील श्याम सदन म्हणजे पूर्वीची रामचंद्र बिल्डिंग सोडून पन्नासहून अधिक वर्ष झाली. तरीही ते दरवर्षी गणेशोत्सवासाठी नियमित हजेरी लावतात.
अवघं जग फिरलो, मात्र श्याम सदनमधील चार भींतींनी जे प्रेम दिलं ते कुठेही मिळालं नाही, अशा भावूक आठवणी जितेंद्र यांनी सांगितल्या.
जितेंद्र यांनी यावेळी जुन्या घरातील अनेक आठवणींना उजाळा दिला.
या सन्मानाबद्दल त्यांचा गिरगावात खास मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ज्यात जितेंद्र यांच्या चित्रपटातील नावांची गुंफण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -