मृत्यूपूर्वी काही तास अगोदर इंदर कुमारची पोस्ट, चाहतेही हळहळले
कता कपूरच्या गाजलेल्या ‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ या मालिकेत 20 वर्षांच्या लीपनंतर त्याने मिहीर विरानी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र काही महिन्यांतच त्याने मालिका सोडली.
त्यानंतर सलमान खानसोबत तुमको ना भूल पाएंगे, वाँटेड यासारख्या चित्रपटात त्याने भूमिका केल्या होत्या. त्याने जवळपास 20 चित्रपटात काम केलं आहे. सध्या तो ‘फटी पडी है यार’ चित्रपटाचं शूटिंग करत होता.
मुंबईतील यारी रोडमधील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूडमधील एकही मोठी व्यक्ती उपस्थित नव्हती.
मुंबईतील अंधेरीतल्या राहत्या घरी इंदर कुमारने अखेरचा श्वास घेतला.
महेश कोठारेंच्या ‘माझा छकुला’वर आधारित ‘मासूम’ या हिंदी चित्रपटातून इंदर कुमारने पदार्पण केलं होतं.
इंदर कुमारच्या अचानक जाण्याने चाहत्यांना धक्काच बसला. त्यातच इंदर कुमारची इंस्टाग्राम पोस्ट पाहून चाहते आणखी भावूक होत आहेत.
जगाचा निरोप घेण्यापूर्वी इंदर कुमारने स्वतःचा फोटो शेअर करत Peace म्हणजे शांती असं लिहिलं होतं.
इंदर कुमारने वयाच्या 45 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मृत्यूच्या काही तास अगोदर त्याने एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली होती, ज्याने चाहतेही हळहळले.
बॉलिवूड अभिनेता इंदर कुमारला अखेरचा निरोप देण्यात आला. वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला.