✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

...म्हणून भारत गणेशपुरे पत्नीसोबतच पुन्हा विवाहबद्ध होणार!

एबीपी माझा वेब टीम   |  09 May 2018 11:34 AM (IST)
1

आपल्या महाराष्ट्राचे लाडके सरपंच...जगभर हास्याची हवा करुन आलेले, विदर्भाचे ब्रॅंड अॅम्बेसेडर भारत गणेशपुरे यांचं आज लग्न आहे. काय म्हणताय भारतचं लग्न झालंय? 18 वर्षांपूर्वी? मग भारत आता कोणाशी लग्न करत आहेत?

2

भारत गणेशपुरे यांच्या लग्नाची पत्रिका

3

'चला हवा येऊ द्या'मधील श्रेया बुगडेने भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याचा फोटो शेअर केला आणि गणेशपुरे यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. भारत कोणाशी लग्न करणार, वधू कोण याबद्दल तर्क लढवण्याआधीच स्पष्ट करतो, ते आपल्या पत्नीसोबतच पुन्हा लगीनगाठ बांधणार आहे, बरं का..

4

हं...पण आता यावेळी 'चला हवा येऊ द्या'च्या टीमला एक तिकीट एक्स्ट्रा बुक करायला लागेल हे तुम्हाला काय आम्ही सांगायला हवं काय?

5

आज सायंकाळी भारत आणि आपल्या वहिनीची गाठ अधिक घट्ट होणार आहे. एकदा लग्न झालं की भारत पुन्हा जगप्रवासाला निघतील हे ओघाने आलंच.

6

अहो कधीचा म्हणून काय विचारताय..आजचा. होय. तब्बल 18 वर्षांनी भारत आपल्या पत्नीसोबत पुन्हा विवाहबद्ध होत आहेत. वहिनी अमरावतीच्याच आहेत. आता संपूर्ण लग्नविधी पुन्हा होणार आहेत, म्हणूनच कालच या दाम्पत्याची हळद झाली. श्रेया बुगडेने फोटोही शेअर केला.

7

त्याचं झालं असं की, 'चला हवा येऊ द्या'ची सगळी टीम जगप्रवासाला निघाली. सगळं आलबेल असताना भारत गणेशपुरे यांना सौम्य अटॅक येऊन गेला. भारत यांचा ज्योतिषशास्त्रावर फार विश्वास आहे. त्यांनी तातडीने हात दाखवला. तर गुरुजी म्हणाले, 'तुमची लगीन गाठ अंमळ सैल होतेय की काय अस वाटतं, घट्ट करा. झालं, भारत मायदेशात परतले आणि थेट मुहूर्त काढला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ...म्हणून भारत गणेशपुरे पत्नीसोबतच पुन्हा विवाहबद्ध होणार!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.