100 कोटी क्लबमध्ये सामील झालेले आमीर खानचे पाच चित्रपट
2014 मधील आमीर खानचा सुपरहिट चित्रपट 'पीके'ही 100 कोटी क्लबचा चित्रपट आहे. या सिनेमात आमीरने एलियनची भूमिका साकारली होती. सिनेमात आमीरसह अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यादीत पहिलं नावं 'गजनी'चं येतं. 2008 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात आमीरसोबत असिनही दिसली होती. 100 कोटींचा गल्ला जमवणारा हा पहिलाच चित्रपट होता.
आमीर खानच्या 'दंगल'ला प्रदर्शित होऊन चारच दिवस झाले आहेत. बॉक्स ऑफिस कलेक्शन्सनुसार, आमीरच्या 'दंगल'ने 3 दिवसातच 100 कोटी क्लबमध्ये जागा पटकावली आहे. सिनेमाची आतापर्यंतची कमाई 106.95 कोटी रुपये झाली आहे. रविवारी या चित्रपटाने 42.35 कोटींची कमाई केली.
'धूम' सीरिजचा तिसरी चित्रपट 'धूम 3'मध्ये आमीर खानसह कतरिना कैफ, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राही होते. या सिनेमात आमीरने जुळ्या भावांची भूमिका साकारली होती. सिनेमाने 100 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती.
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा दंगल सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. यानिमित्ताने आमीर खानच्या ज्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे, त्या चित्रपटांची नावं सांगणार आहोत.
आमीर खानचा '3 इडियट्स' 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. भारतीय शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या सिनेमात आमीरसह करीना कपूर, शर्मन जोशी, आर. माधवन आणि बोमन इराणी महत्त्वाच्या भूमिकेत होते. या सिनेमाही 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -