शाहरुख आणि सलमानच्या फ्लॉप सिनेमांवर आमिर म्हणतो...

सलमान आणि शाहरुख मोठे कलाकार आहेत. त्यांच्या कामाचा मी देखील फॅन आहे. मला अशा प्रकारे तुलना करायची नाही. सर्व जण अद्वितीय आणि वेगळे आहेत, असं आमिर म्हणाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट'च्या अपयशानंतर सलमानच्या हिट सिनेमांची मालिका खंडीत झाली. तर शाहरुखही हिट सिनेमांसाठी संघर्ष करताना दिसत आहे.

मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान दोघंही मोठे कलाकार आहेत. त्यांचे अलिकडच्या काळातील काही सिनेमे फ्लॉप झाल्यामुळे त्यांच्या स्टारडमवर प्रश्न उपस्थित करु नयेत, असं मत बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता आमिर खानने व्यक्त केलं.
आमिरने नुकतंच त्याचा आगामी सिनेमा 'सिक्रेट सुपरस्टार'चा ट्रेलर लाँच केला. हा सिनेमा दिवाळीला रिलीज होणार आहे.
तिन्ही खान पैकी आमिर सर्वाधिक कमाई करणारा सुपरस्टार आहे का? या प्रश्नावरही आमिरने उत्तर दिलं. यावरही आमिरने त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं. कल्पक काम सर्वांना अपेक्षित असतं, आम्हीही सर्व जण आमच्याकडून चांगलं देण्याचा प्रयत्न करतो, असं आमिर म्हणाला.
आम्हाला कधी यश येतं, तर कधी अपयश. पण एक किंवा दोन सिनेमांमुळे स्टारडमवर परिणाम होतो, असं वाटत नसल्याचंही आमिरने सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -