'चला हवा येऊ द्या'मध्ये पानी फाऊंंडेशनची टीम
'चला हवा येऊ द्या'च्या या भागात 'पानी फाऊंडेशन'च्या टीमसह एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, मंदार फणसे (आयबीएन लोकमत) आणि निलेश खरे (जय महाराष्ट्र) हे देखील उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आणि महाराष्ट्रला पाणीदार बनवण्यासाठी आमीर खान, सत्यजीत भटकळ, डॉ. अविनाश पोळ यांनी पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून चळवळ सुरु केली आहे.
गुढीपाडव्या निमित्ताने अभिनेता आमीर खान, किरण रावसह 'पानी फाऊंडेशन'च्या टीमने झी मराठीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावली.
या विशेष एपिसोडमध्ये आमीर खानने 'पानी फाऊंडेशन'च्या कामाची माहिती दिली.
यंदा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा दुसरा सीझन आहे. 8 एप्रिलपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत 30 तालुक्यातील 2024 गावांनी सहभाग घेतला आहे.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा जनमानसात पोहोचवण्यासाठी पानी फाऊंडेशनला एबीपी माझाने मोलाची साथ दिली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -