बॉलिवूड अभिनेत्री लिजा हेडनचं बीच वेडिंग
'क्वीन' चित्रपटात तिने साकारलेल्या विजयालक्ष्मीच्या व्यक्तिरेखेचं चांगलंच कौतुक झालं.
चेन्नईत जन्मलेल्या 30 वर्षीय लिजाचं बरंचसं आयुष्य परदेशात गेलं. मुंबईत येण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत तिचं वास्तव्य होतं. मुंबईत आल्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये करिअर केलं आणि 2010 मध्ये आयेशा चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं.
लिजा हेडन 'ऐ दिल है मुश्किल', 'क्वीन', 'हाऊसफुल 3', 'आएशा' यांसारख्या चित्रपटात झळकली आहे.
लग्नात लिजाने शुभ्र रंगाचा गाऊन परिधान केला होता. थायलंडमध्ये अतिशय सुंदर रोमँटिक पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला.
लिजाने इन्स्टाग्रामवरुन लग्नाचे फोटो शेअर करत ही बातमी सांगितली. दिनो लालवानी पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश बिझनेसमन आहे.
बॉलिवूड अभिनेत्री लिजा हेडन नुकतीच लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेण्ड दिनो लालवानीसोबत दिवाळीच्या मुहूर्तावर ती बोहल्यावर चढली.