कल्याणमध्ये 'आजीच्या भातुकली'चं प्रदर्शन
एबीपी माझा वेब टीम | 20 Jan 2019 03:23 PM (IST)
1
अगदी आगपेटीच्या आगगाडीपासून नारळाच्या करवंटीचा उपयोग घोड्यांच्या टापांचा आवाज काढण्यासाठी कसा केला जायचा, याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येतंय.
2
तसेच 80 आणि 90 च्या दशकात असलेली खेळणीसुद्धा या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
3
प्रदर्शनात विहिरीचा हातपंप, जुनी भांडी, खलबत्ता, लाकडी भातुकली, पितळीची भांडी, मातीची भातुकली आणि चांदीच्या भातुकलीचा समावेश आहे.
4
प्रदर्शनात तब्बल 1500 प्रकारची जुनी भातुकलीची खेळणी लहान मुलांना पाहता येणार आहेत.
5
कल्याणच्या फडके मैदानात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाला 'आजीची भातुकली' असं नाव देण्यात आलंय.
6
मोबाईल आणि कॉम्प्युटर गेम्समध्ये गढून गेलेल्या आजच्या पिढीला जुन्या खेळांची माहिती या प्रदर्शनातून देण्यात आली आहे.
7
कल्याणच्या फडके मैदानामध्ये 'आजीच्या भातुकली'चं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
= 7">