धुळ्यात पावसाचा कहर, 800 हेक्टरवरील पिकांचं नुकसान
पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणचे पंचनामे चालू असल्याचं तहसिल कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंपूर्ण जिल्ह्यात मिळून पावसाने 842.95 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
धुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 54 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कापूस, बाजरी,भुईमूग,मका,कांदा,यांसह फळबागांचं देखील नुकसान झालं आहे.
साक्री तालुक्यात दोन ठिकाणचे पाझर तलाव फुटले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
पावसाचा जनावरांनाही फटका बसला. 163 जणावरं दगावल्याची नोंद झाली आहे . तर 72 घरांची पडझड झाली आहे. पाऊस अजूनही सुरूच आहे. पूरस्थिती असल्यामुळे पांझरा, तापी नदी काठच्या गावांना सर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
धुळे जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. या पावसाचा साक्री तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय. मुसळधार पावसाने साक्री तालुक्यातील 500 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -