जंगलात 7 दिवस अन्न-पाण्याविना राहिलेला तो चिमुकला
या मुलाचं नाव यामाटो तंदूका असं आहे. यामाटो 7 दिवस जंगलात अन्न-पाण्याविना राहिला. पालकांचा ओरडा खाऊनही वठणीवर न आलेल्या यामातोला मोठी शिक्षा द्यायचं पालकांनी ठरवलं. परत येताना त्यांनी पोटच्या पोराला गाडीतून खाली उतरवलं आणि गाडी पुढे नेली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याच्या वडिलांनी त्याला जिथे सोडलं होतं, तिथून तब्बल चार किलोमीटर अंतरावर जंगलात असलेल्या सैन्य प्रशिक्षणाच्या छोट्या इमारतीजवळ सापडला. मुलाने खोड्या केल्या म्हणून वडिलांनी 28 मे रोजी त्याला जंगलात सोडून दिलं होतं. काही क्षणांपूर्वी मुलाला ज्या ठिकाणी सोडलं होतं, तिथे तो न सापडल्याने मात्र पालकांचे धाबे दणाणले. पालकांनी पोलिसात धाव घेत आपला लेक हरवल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांसह 180 जणांचं पथक, कुत्रे आणि घोड्यांसह मुलाचा शोध घेत होतं. जंगलात यामाटोचा शोध घेणाऱ्या सेल्फ डिफेन्स फोर्सच्या जवानांना तो सैन्य प्रशिक्षणासाठी बनवलेल्या एका इमारतीजवळ सापडला. त्यावेळी त्याला खूप भूक लागली होती. त्याचा शोध घेणाऱ्या जवानांनी त्याला सर्वात आधी पाणी आणि नंतर खायला दिलं.
योमाटो जंगलात 7 दिवस अन्न-पाण्याविना एकटाच राहिला, याबद्दल जगभर त्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
खोडसाळपणा करत नाही असे मुलं जगात सापडणार नाहीत. खोडसाळपणावर आई-वडील जास्तीत जास्त ओरडतात किंवा मारतात. पण तुम्हाला हे ऐकुन धक्का बसेल की, खोडसाळपणामुळे आई-वडीलांनी 7 वर्षांच्या चिमुकल्याला चक्क जंगलात सोडून दिलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -