✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत 115 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती!

एबीपी माझा वेब टीम   |  07 Mar 2017 07:30 PM (IST)
1

बंगळुरु कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये नॅथन लॉयनने 8 विकेट घेतल्या, तर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये रवींद्र जाडेजाने 6 गडी बाद केले. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये जोश हेझलवुडने 6 गडी बाद केले आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विनने 6 फलंदाजांना माघारी धाडलं.

2

क्रिकेटच्या इतिहासात 1902 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटीत चारही इनिंगमध्ये 6-6 विकेट घेतल्या होत्या.

3

बंगळुरु कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 87 धावांची आघाडी घेतलेली असतानाही, टीम इंडियाने या कसोटीला कलाटणी दिली आणि 75 धावांनी विजय खेचून आणला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 112 धावांवर बाद झाला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

4

त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ओव्हलच्या मैदानावरील सामन्यात चारही इनिंगमध्ये गोलंदाजांनी 6-6 विकेट घेतल्या होत्या.

5

टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या डावात पाचव्या विकेटसाठी केलेली 118 धावांची भागीदारी टर्निंग पॉइंट ठरली. शिवाय आर. अश्विनने घेतलेल्या सहा विकेट्सने हा विजय खेचून आणला.

6

या रोमांचक सामन्यात तब्बल 115 वर्षांच्या विक्रमाचीही पुनरावृत्ती झाली. या सामन्यातील चारही इनिंगमध्ये उभय संघांच्या एका गोलंदाजाने प्रत्येकी सहा विकेट घेण्याचा विक्रम नोंदवला.

7

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल शंभरहून अधिक वर्षांनंतर या विक्रमची पुनरावृत्ती झाली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत 115 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.