अँड्रॉईड मोबाईलचं इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी 6 टिप्स

अँड्रॉईड मोबाईलचं इंटरनेट स्पीड ही अनेकांची समस्या आहे. 3G किंवा 4G नेटवर्क असूनही इंटरनेटचा वेग मंदावतो. त्यामुळे युझर्सना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र काही अशा टिप्स आहेत, ज्यामुळे इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्पीड वाढवणारे अॅप : वर दिलेले सर्व उपाय तुम्ही करुन पाहिले असतील तर तुम्ही स्पीड वाढवणाऱ्या अॅपचाही वापर करु शकता. इंटरनेट स्पीड बूस्ट करणारे अनेक अॅप प्ले स्टोअरवर मिळतील.

फास्ट ब्राऊजर : अँड्रॉईडसाठी प्ले स्टोअरवर असे काही ब्राऊजर मिळतील, जे तुम्हाला इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी मदत करतात. यामध्ये ओपेरा मिनी, यूसी ब्राऊजर आणि क्रोम यांचा समावेश आहे. प्ले स्टोअरमध्ये इंटरनेट स्पीडसाठी अनेक ब्राऊजर उपलब्ध असतील. मात्र कोणतंही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची खात्री करा.
प्रिफर नेटवर्क 3G/4G : तुम्हाला मोबाईलवर कोणतं नेटवर्क ठेवायचं ते तुम्ही ठरवू शकता. 2G नेटवर्क असेल तर स्पीड कमी मिळेल. त्यामुळे सेटिंगमध्ये जाऊन 3G/4G नेटवर्क निवडा.
ब्राऊजर मोडमध्ये Text मोड निवडा : ब्राऊजरमध्ये सर्फिंग करताना तुम्हाला केवळ टेक्स्ट सर्च करायचा असेल आणि इमेजेसची गरज नसेल, तर अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन Text मोड निवडा. यामुळेही इंटरनेट स्पीड वाढेल.
अनावश्यक अॅप अनइंस्टॉल करा : तुम्हाला एखाद्या अॅपची गरज नसेल तर ते अनइंस्टॉल करा. कारण जास्त अॅप असल्यामुळेही त्याचा इंटरनेट स्पीडवर परिणाम होतो.
कॅशे क्लिअर करा : इंटरनेट स्पीड कमी मिळत असेल, तर कॅशे मेमरी क्लिअर करा. कॅशे मेमरी जास्त होईल तेव्हा इंटरनेटचा वेग मंदावतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -