Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'उडता पंजाब'च नव्हे, हे सिनेमेही ड्रग्जमुळे वादात
मुंबई हायकोर्टाने उडता पंजाब या सिनेमावरुन सेन्सॉर बोर्डाची कानउघाडणी करत 48 तासात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. उडता पंजाब सिनेमात ड्रग्जची समस्या दाखवण्यात आली आहे. ड्रग्जच्या समस्येवरुन केवळ उडता पंजाबच नव्हे तर यापूर्वी अनेक सिनेमे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'गो गोवा गॉन' हा बहुचर्चित सिनेमा रेव्ह पार्ट्यांवर आधारित होता. यामध्ये सैफ अली खान, कुणाल खेमू, वीर दास आणि आनंद तिवारी मुख्य भूमिकेत होते.
गोव्यातील ड्रग्जच्या समस्येवर 2011 साली 'दम मारो दम' हा सिनेमा काढण्यात आला होता. बिपाशा बसू आणि अभिषेक बच्चन या सिनेमात मुख्य भूमिकेत होते.
2011 साली आलेल्या 'सैतान' सिनेमात ड्रग्जमुळे उध्वस्त झालेल्या पाच मित्रांची कहाणी दाखवण्यात आली आहे.
अलीकडच्या काळात 2010 साली आलेल्या 'पंख' या सिनेमात ड्रग्जच्या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला होता. बिपाशा बसू यामध्ये मुख्य भूमिकेत होती.
'चरस' हा 1976 साली आलेला सिनेमा स्मगलिंगवर आधारित होता. या सिनेमात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रमुख भूमिका होती.
'हरे रामा हरे कृष्णा' हा 1971 साली आलेला सिनेमा ड्रग्जवरुन वादात सापडला होता. या चित्रपटात ड्रग्जची समस्या दाखवण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -