6 जीबी रॅमचे 5 जबरदस्त स्मार्टफोन
असूस जेनफोन 3 डिलक्स (जेडएस 570 केएल) - 6 जीबी रॅम हे मुख्य आकर्षण असलेला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 62 हजार 999 रुपयांना लॉन्च झाला होता. मात्र, ग्राहकांसाठी अद्याप हा स्मार्टफोन उपलब्ध झाला नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाओमी नोट 2 - जवळपास 34 हजार रुपये किंमतीच्या या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आहे. हा स्मार्टफोन ड्युअल कव्हर्ड स्क्रीनसोबत आहे. सध्या चीनमधील बाजारपेठेत हा स्मार्टफोन उपलब्ध असून, लवकरच भारतीय यूझर्ससाठीही उपलब्ध केला जाणार आहे.
आपला स्मार्टफोन अधिकाधिक वेगवान असावा, असे प्रत्येक स्मार्टफोन यूझरला वाटत असते. त्यासाठी दोन किंवा तीन जीबी रॅमचे स्मार्टफोन खरेदी करण्याकडे अनेकांचा कल दिसतो. मात्र, आता मोबाईल बाजारात 6 जीबी रॅमचे स्मार्टफोनही दाखल झाले आहेत. आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनबाबत माहिती देणार आहोत :
वनप्लस 3 - या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम असून, याची किंमत 27 हजार 999 रुपये आहे. शिवाय, या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर देण्यात आला आहे.
शाओमी मी 5 एस प्लस - गेल्याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च झाला. 128 जीबी व्हेरिएंटच्या या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आहे. चीनमध्ये या स्मार्टफोनची किंमत सुमारे 26 हजार रुपये आहे.
लेईको ले मॅक्स 2 - 6 जीबी रॅम, 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन भारतात 29 हजार 999 रुपयांना लॉन्च केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -