Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जीएसटीनंतर स्वस्त झालेले 5 स्मार्टफोन, किंमत किती?
पॅनासॉनिक एलूगा I3 मेगा : पॅनासॉनिक एलूगा I3 मेगा स्मार्टफोनच्या किमतीतही 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन यंदाच मे महिन्यात लॉन्च केला होता, ज्याची किंमत 9990 रुपये होती. आता हा फोन 8990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे याची 4000 एमएएच बॅटरी. हा फोन 3 GB रॅमसह 1.3 गिगाहर्त्झ क्वॉडकोअर मीडियाटेक एमटीके 6735 प्रोसेसरवर चालतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअॅपल आयफोन SE : अॅपलच्या 4 इंचाच्या आयफोन SE ची किंमतही कमी झाली आहे. आयफोन SEचं 32 GB मॉडेल आता 26,000 रुपयांमध्ये (1200 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर) खरेदी करु शकता. तर या स्मार्टफोनच्या 128 GB मॉडेलची किंमत 35,000 रुपयांमध्ये (2200 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर) खरेदी करता येऊ शकतो. अॅपल आयफोन SE (16 GB) एप्रिल 2016 मध्ये भारतात 39,990 रुपयांमध्ये लॉन्च होता.
अॅपल आयफोन 7 : अॅपलचा आयफोन 7 मधील सर्व व्हेरिएंटच्या किंमतीत कपात झाली आहे. 32GB व्हेरिएंटचा स्मार्टफोन जो पूर्वी 60,000 रुपयांमध्ये मिळायचा, तो आता 56,200 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनच्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 70,000 होती, आता 65200 रुपये आहे. तर 256 GB व्हेरिएंट 74,400 रुपयांना मिळत आहे. या फोनची पूर्वीची किंमत 80000 रुपये होती.
अॅपल आयफोन 7 प्लस : (32 GB) व्हेरिएंटचा अॅपलचा आयफोन 7 प्लस आता 67,300 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन आधी 72,000 रुपयांना मिळत होता. तर या स्मार्टफोनच 128 GB मॉडेल आता 76,200 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. 256 GB मॉडेलची किंमत 85,400 रुपये झाली आहे.
असूस झेनफोन 3 : 3,000 रुपयांच्या कपातीनंतर असूस झेनफोन 3 खरेदी करता येऊ शकतो. म्हणजेच हा स्मार्टफोन 16,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होईल. मागील वर्षी ऑगस्टमध्ये भारतात हा स्मार्टफोन 27,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता.
मुंबई : जीएसटी लागू होण्यापूर्वी बहुतांश ई-कॉमर्स कंपन्यांनी मागील आठवड्यात स्मार्टफोनवर डिस्काऊंट दिला होता. पण आता जीएसटी लागू झाल्यानंतरही स्मार्टफोन बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनी हॅण्टसेटच्या किमतीत कपात केली आहे. त्यामुळे तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आताच चांगली संधी आहे. या स्मार्टफोनवर डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. याशिवाय अॅपलने नुकतंच देशभरात सर्व उत्पादनांवर कपात केली आहे. कंपनीने आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक सीरिजसाठी 4 टक्क्यांपासून 7.5 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा केली आहे. आता आम्ही अशा स्मार्टफोनची माहिती देत आहोत, ज्याच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -