BMW कारपेक्षाही या आहेत महागड्या नेल पॉलिश!
Red Carpet नेल पॉलिश: किंमत $1000 हजार डॉलर
Iced Manicure नेल पॉलिश: किंमत $51,000 हजार डॉलर
ऐले कॉस्मेटिक ची 'I Do' नेल पॉलिशची किंमत $55000 हजार डॉलर आहे. ही नेल पॉलिश परदेशात बरीच प्रसिद्ध आहे.
महागड्या नेलपॉलिशमध्ये 'गोल्ड रश कोचर'चा नंबर लागतो. याची किंमत $130,000 लाख डॉलर आहे. या नेल पॉलिशमध्ये सोनं आणि हिऱ्याचे अंश आहेत.
'एजचर' या ब्रॅण्डनं नवी नेल पॉलिश बाजारात आणली होती. या नेल पॉलिशची किंमत तब्बल $250,000 लाख डॉलर आहे. याची खासियत म्हणजे यामध्ये 267 कॅरेट ब्लॅक डायमंड आहे. ज्यामुळे ही सर्वाधिक महागडी नेल पॉलिश आहे. ही नेल पॉलिश आजवर 25 जण खरेदी करु शकले आहेत. तर 576 जणांनी यासाठी नोंदणी केली आहे.
महागड्या आणि ब्रॅण्डेड नेल पॉलिश लावणं अनेक जणींना आवडतं. बाजारातही वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या आणि महागड्या नेल पॉलिश पहायला मिळतात. पण आता बाजारात एक अशी नेल पॉलिश आली आहे की जिची किंमत 1 कोटींपेक्षाही अधिक आहे.