जेलची हवा खाल्लेल्या बॉलिवूड अभिनेत्री!
बॉलिवूड अभिनेत्री आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची गर्लफ्रेण्ड मोनिका बेदीलाही तुरुंगाची हवा खाल्ली होती. 2006 मध्ये खोट्या नावाने बनावट पासपोर्ट प्रकरणी तिला पोर्तुगालमध्ये अटक झाली होती.
अभिनेत्री सोनाली बेंद्रेवरही जेलची हवा खाण्याची वेळ ओढावली होती. 'ओम' आणि 'ओम नम: शिवाय' असं लिहिलेला पिवळा कुर्ता परिधान करुन धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांतर्गत सोनालीला 2001मध्ये जेलमध्ये जावं लागलं होतं. फक्त सोनालीच नाही तर ड्रेस डिझायनरलाही ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर 12,000 हजारांच्या जातमुचलक्यावर दोघांची जामीनावर सुटका करण्यात आली.
'मकडी' आणि 'इक्बाल'मधील अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकली होती. हैदराबादमधील एका हॉटेलच्या रुममध्ये पोलिसांनी श्वेताल आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पडकलं होतं. त्यानतंर तिला पोलिस कोठडीत नेण्यात आलं. दोन महिने रिमांड होममध्ये राहिल्यानंतर तिला सोडण्यात आलं.
महिलेला धमकावून मारहाण केल्याप्रकरणी 'जय हो' सिनेमातील अभिनेत्री सना खान आणि तिच्या बॉयफ्रेण्डवर जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती. संबंधित महिला तपासणीसाठी रुग्णालयात गेली होती. तिथे सना खान, तिचा बॉयफ्रेण्ड आणि नोकराने त्या महिलेला खेचत बाहेर आणलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला आणि तिघांना अटक केली.
हिंदी चित्रपट सृष्टीतील सौंदर्यवती अर्थात अभिनेत्री मधुबालाला 1957 मध्ये जेलची हवा खावी लागली होती. कामाची कमिटमेंट पूर्ण न केल्याने तिला जेलमध्ये जावं लागलं होतं. मधुबालाने बीआर चोप्रा यांचा सिनेमा साईन केला होता, शिवाय त्याचे अडव्हान्स पैसेही घेतल होते. पण नंतर सिनेमा करण्यास तिने नकार दिला.