वर्षभरात महाराष्ट्रातून 49 हजार महिला बेपत्ता
एबीपी माझा वेब टीम | 01 Dec 2017 11:09 PM (IST)
1
काही जण स्वतहून पळून जातात, कोणी प्रेमभंगातून घरं सोडतं तर कुणी भविष्य घडवण्यासाठी बाहेरचा रस्ता धरतं.
2
पश्चिम बंगालपाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
3
देशभरातून गेल्या वर्षभरात ५ लाख ४९ हजार नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यापैकी २ लाख २९ हजार ३८१ नागरिकांचा शोध घेण्यास तपास यंत्रणेला यश आले. तर अजूनही ३ लाख १९ हजार नागरिक बेपत्ताच्या यादीत आहेत. यामध्ये १ लाख ७४ हजार ८१६ महिलांचा समावेश आहे.
4
धक्कादायक म्हणजे बेपत्ता नागरिकांच्या यादीत वर्षभरात राज्यातील तब्बल 49 हजार महिला बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे.
5
महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित असल्याचं राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आलं आहे.
6
कोपर्डीच्या निर्भयाप्रकरणाचा निकाल ताजा असतानाच आता राज्यातील महिलांसंबधी नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.