Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेनेची तोफ धडाडणार, सभा गाजवण्यासाठी चार हुकमी एक्के सज्ज
सुभाष देसाई – राज्य मंत्रिमंडळात उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर शिवसेनेप्रती असलेली निष्ठा पाहून सुभाष देसाईंना उद्योगमंत्री करण्यात आले. मतिभाषी आणि अत्यंत मृदू स्वभाव सुभाष देसाई शिवेसेनेची कोणतीही भूमिका अत्यंत शांतपणे मांडत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. राज्यभर प्रचाराचा धुरळा उडत आहे. युत्या-आघाड्यांची जुळवा-जुळव सुरु असतानाच, शिवसेनेने राज्यभरात प्रचारासाठी चार हुकमी एक्क्यांची निवड केली आहे. शिवसेनेचा आवाज आणि विकासामांची यादी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं हे चार जण करणार आहेत.
राज्याचे पर्यायवरण मंत्री रामदास कदम, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते अमोल कोल्हे आणि शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील हे चार जण राज्यभर शिवसेनेचे मेळावे घेणार आहेत. भाषण करणाऱ्यांमधील मास्टर समजले जाणारे नेते महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने प्रचारासाठी उतरवले आहेत.
रामदास कदम – राज्य मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री असलेले रामदास कदम आपल्या आक्रमक स्वभावामुळे ओळखले जातात. तळागाळातून आलेले कट्टर शिवसैनिक आणि ठाकरे कुटुंबाचे निष्ठावंत म्हणूनही रामदास कदम यांची ओळख आहे. ‘रामदासभाई’ अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ओळख अससलेले रामदास कदम हे शिवसेनेविरोधात बोलणाऱ्यांना नेहमीच धारेवर धरत आले आहेत.
शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील – जगातील सर्वात लहान वयाचा महानाट्यकार अशी ओळख असलेले शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील शिवसेनेच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आता ते सातारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आहेत. आपल्या धारदार शब्दांनी श्रोत्यांवर अधिराज्य गाजवणाऱ्या नितीन बानगुडे यांचा प्रचारादरम्यान फायदा होईल, अशी शिवसेनेला आशा आहे.
डॉ. अमोल कोल्हे – डॉक्टर, अभिनेता आणि आता राजकीय नेते, असा प्रवास असणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत बऱ्यापैकी महत्त्वाचं स्थान निर्माण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील मालिकेत शिवरायांची भूमिका साकारल्याने महाराष्ट्रासह देशभरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये विशेष आकर्षण आहे. शिवाय, डॉ. कोल्हे यांची मुद्देसूद आणि स्पष्ट वक्तृत्व शैलीही शिवसेनेच्या प्रचारासाठी महत्त्वाची ठरू शकते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -