उरणमध्ये 4 संशयित, पोलिसांकडून शोधमोहिम, मुंबईतही नाकेबंदी
एबीपी माझा वेब टीम | 22 Sep 2016 07:25 PM (IST)
1
उरण शहरात 4 संशयित तरुण घुसल्याची माहिती मिळत आहे. या संशयितांकडे बंदुका असल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बंदुकधाऱ्यांना पाहिल्याची माहितीही देण्यात येत आहे.
2
3
दरम्यान यापार्श्वभूमीवर मुंबईतही नाकेबंदी करण्यात आली आहे.
4
पोलीस आणि नेव्हीच्या पथकांनी या परिसरात शोधमोहीम सुरु केली आहे. नेव्हीची मार्कोस टीम शाळेत हजर झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
5
काळे कपडे घालून आलेल्या संशयितांकडे शस्त्र असल्याची माहिती शाळकरी मुलांनी दिली. उरण हा अतिसंवेदनशील भाग असल्याने मुलांच्या माहितीवर सर्च ऑपरेशन सुरु आहे.
6
उरणमध्ये क्यूआरटी, क्राईम ब्रान्च, नौदल, पोलिस, कोस्टल पोलिस सीआयएसएफची तुकडी यांचं एकत्रित सर्च ऑपरेशन सुरु आहे.