मुंबईकर मनोविकाराच्या छायेत?
महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये म्हणजेच केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांमध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या दोन वर्षांच्या कालावधीत येऊन गेलेल्या रुग्णांपैकी पाच लाख 59 हजार 954 रुग्णांची माहिती अभ्यासण्यात आली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 31.14 टक्के रुग्ण हे मनोविकारांवरील (Psychiatric Disorders) उपचारांसाठी आल्याचे दिसून आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुग्णसंख्येच्या प्रमाणानुसार क्रमवारी ठरवल्यास त्यामध्ये मनोविकार आणि रक्तदाब-मधुमेहानंतर श्वान/प्राणी दंश, हृदयविकार, डेंग्यू, दमा, अनाकलनीय ताप, जुलाब आणि मलेरिया या आजारांचा समावेश आहे. याचप्रमाणे महापालिकेच्या 15 उपनगरीय रुग्णालयांमध्ये आणि 175 दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्येही जीवनशैलीशी निगडीत आजारांचे (Lifestyle Diseases) मोठे प्रमाण आढळून आले आहे.
याव्यतिरिक्त सात दिवस रुग्णालयात वा दवाखान्यात प्रत्यक्ष जाऊन, त्या सात दिवसात आलेले बाह्यरुग्ण किंवा आंतररुग्ण म्हणून दाखल झालेल्या एक लाख 13 हजार 472 रुग्णांच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. यानुसार तब्बल 73 लाख 74 हजार 602 रुग्णांच्या माहितीवर आधारित अभ्यास अहवाल नुकताच महापालिका प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महापालिकेची चार प्रमुख रुग्णालयं, 15 उपनगरीय रुग्णालयं आणि 175 दवाखान्यांमध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या दोन वर्षांच्या कालावधीत आलेल्या रुग्णांपैकी 72 लाख 61 हजार 130 रुग्णांशी संबंधित माहितीचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
तर त्याखालोखाल सुमारे 23 टक्के रुग्ण हे रक्तदाब आणि मधुमेहाचे असल्याचे आढळून आलं आहे.
महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक म्हणजे 31 टक्के रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित आहेत,.
मुंबईत मनोविकाराने त्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -