युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील तीन ठिकाणांचा समावेश
युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत नव्या 12 ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत तीन भारतातील ठिकाणे आहेत.
युनोस्कोच्या तर्कस्थानमधील इस्तंबुलमध्ये झालेल्या 40 व्या बैठकीत या नव्या 27 पैकी एकूण 21 ठिकाणांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला. या 21 पैकी 12 ठिकाणे सांस्कृतिक वारसा सांगणारी आहेत. तर 6 नैसर्गिक आणि 3 इतर वर्गातील आहेत.
त्याचबरोबर बिहारमधील नालंदा विद्यापीठाचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
या 12 जणांच्या यादीतील भारतातील खानचॅनझोंगा (Khangchendzonga) या सिक्कीममधील राष्ट्रीय उद्यानाचा नैसर्गिक वारसा यादीत समावेश आहे.
या यादीत जॉर्जियाची नैदलाची इमारत, ब्राझीलमधील पॅम्पुला मॉडर्न इन्सेंमबलचाही समावेश आहे.
युनेस्कोने आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या देशातील स्थानांना महत्त्व दिले आहे.
याच बरोबर चंदीगढच्या कॅपिटल बिल्डींगचा ही समावेश आहे. या इमारतीचा समावेश सांस्कृतिक वारसांतर्गत करण्यात आला आहे. या इमारतीत हरयाणाची विधानसभा, सचिवालय, आणि उच्च न्यायालय आहे.