केरळमध्ये पावसाचा हाहाकार, 22 जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत
केरळला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यात एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळात अनेक ठिकाणी पूर आले असून काही ठिकाणी दरडसुद्धा कोसळली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आपातकालीन समयी केंद्र सरकारकडून केरळला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मोदींनी दिले.
पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आपातकालीन समयी केंद्र सरकारकडून केरळला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मोदींनी दिले.
आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आलेल्या माहितीनुसार इडुक्की मध्ये दरड कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कन्नुरमध्ये दोघांचा आणि वायनाड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -