वॅगन आर नव्या स्वरुपात! किंमत फक्त...
'मारुती सुझुकी' कंपनीने 'वॅगन आर' ही कार नव्या स्वरुपात बाजारात आणली आहे. सुरुवातीच्या मॉडेलपेक्षा नवी गाडी वेगळ्या धाटणीची आहे. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)
सात इंचाच्या स्मार्टप्ले स्टुडिओ इंफोटेनमेंट सिस्टमने जुन्या डॅशबोर्डची जागा घेतली आहे. टचस्क्रीन, नेव्हिगेशन असलेली ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसुद्धा उपलब्ध आहे. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)
'वॅगन आर'ला 1 लीटर आणि 1.2 लीटर असे इंजिनचे दोन पर्याय आहेत. अद्यापी सीएनजीचं वेरिएंट या मॉडेलमध्ये लाँच करण्यात आलेलं नाही. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)
नव्या 'वॅगन आर' कारची किंमत 4.19 लाखांपासून (एक्स शोरुम-दिल्ली) सुरु होते. ही रेंज जवळपास 5.69 लाख रुपयांपर्यंत जाते. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)
स्वीफ्ट, डिझायर, बलेनो, इग्नाईस याासरख्या गाड्यांच्या तोडीचं 1.2 लीटर क्षमतेचं इंजिन नव्या वॅगन आरमध्ये आहे. हा नव्या वॅगन आरचा सर्वात महत्त्वाचा बदल आहे. (फोटो : मारुती सुझुकी वेबसाईट)