युवीच्या विक्रमाशी बरोबरी, 19 वर्षाच्या बॅट्समनने ठोकले सहा षटकार!
भारताच्या शार्दूल ठाकूरनं हॅरिस शील्डच्या एका सामन्यात एकाच षटकात सहा षटकार ठोकले होते.
इंग्लंडच्या जॉर्डन क्लार्क आणि अॅलेक्स हेल्सनंही देशांतर्गत सामन्यात हा पराक्रम गाजवला होता.
गॅरी सोबर्स यांनी कौंटी क्रिकेटमध्ये आणि रवी शास्त्रीनं रणजी करंडकात हीच कामगिरी बजावली होती.
युवराजनं 2007च्या ट्वेन्टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सहा षटकार ठोकले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ हर्षल गिब्स आणि भारताच्या युवराज सिंगनंच ही कामगिरी बजावली आहे. गिब्जनं 2007च्या विश्वचषकादरम्यान न्यूझीलंडविरुद्ध हा पराक्रम गाजवला होता.
ग्लेन सध्या इंग्लंडच्या मॅरिलिबॉन क्रिकेट क्लबकडून खेळतो आहे. एमसीसीविरुद्ध नॉरफोल्क इलेव्हन या सामन्यादरम्यन ग्लेननं एकाच षटकात सहा षटकार ठोकले.
न्यूझीलंडचा युवा फलंदाज ग्लेन फिलिप्सनं एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला ग्लेन फिलिप्स ऑकलंडचा रहिवासी असून, एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यानं अंडर-19 विश्वचषकात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं होतं.