विराटच्या करिअरमधील 13 गोष्टी
एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 7 हजार धावा ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या अचानक कसोटी निवृत्तीनंतर विराटला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत विराटने टीम इंडियाला अव्वल स्थानी आणलं.
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीचा आज 28 वा वाढदिवस आहे. विराटने अत्यंत कमी वयात क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
सर्वात जलद 20 शतक ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकणारा विराट पहिलाच भारतीय खेळाडू आहे.
कर्णधार म्हणून लागोपाठ तीन शतक ठोकणारा विराट पहिलाच कर्णधार आहे.
विराटने 2006 मध्ये पहिला रणजी सामना वडिलांचं निधन झालं त्या दिवशी खेळला. या सामन्यात विराटने 90 धावा केल्या होत्या.
कर्णधार म्हणून दोन द्विशतक ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.
विराट आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या अफेअरबद्दल सर्वांनाच माहित आहे. मात्र विराटचा पहिला क्रश अभिनेत्री करिष्मा कपूर होती. लहानपणापासून करिष्मा आपल्याला आवडते, असं विराटने अनेकदा सांगितलं आहे.
विराट कोहलीचं नाव 'चिकू' आहे. सचिन तेंडुलकरपासून टीम इंडियाचे सर्व खेळाडू विराटला चिकू नावानेच बोलावतात.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या या महान खेळाडूंनंतर 26 वे शतक ठोकण्याचा मान विराटला मिळाला आहे.
आयपीएलमध्येही विराटच्या नावावर अनेक विक्रम आहेत.
विराट आपलं सामाजिक भानही जपतो. गरिबांसाठी 'विराट कोहली फाऊंडेशन' ही एनजीओ विराट चालवतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -