12 डिसेंबर : दिग्गजांचा जन्मदिन असलेला दिवस
मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व अन् दमदार नेतृत्व म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. या वयातदेखील पवारांचा झंझावात कायम आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं मोठं काम शरद पवारांनी केलं. वाढदिवसानिमित्त राज्यातून आलेल्या कार्यकर्ते आणि नागरिकांना शरद पवार मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेटणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940रोजी पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे कृषीमंत्री असा पल्ला गाठणाऱ्या शरद पवार यांचं राष्ट्रीय राजकारणातील स्थान अढळ आणि महत्त्वाचं आहे. केवळ राजकारणच नाही तर क्रिकेटचं मैदानही पवारांनी गाजवलं. पवार 2005 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. त्यानंतर 2010 मध्ये ते आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.
दक्षिण चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार, थलाईवा यांसारख्या बिरुदावली मिरवणारे अभिनेते रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. रजनीकांत यांचा वाढदिवस त्यांच्या देशभरातील कोट्यवधी चाहत्यांसाठी एखाद्या सण-उत्सवापेक्षा कमी नसतो. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. 12 डिसेंबर 1950 ला बंगळुरुतील मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
रजनीकांत आपल्यासारखेच माणूस असले तरी तामिळनाडूतील किंवा दाक्षिणेतील राज्यात त्यांना देवाचा दर्जा देतात. त्यांनी अभिनयामुळे जेवढं नाव कमावलं आहे, त्यापेक्षा जास्त लोकप्रियता लोकांसाठी केलेल्या कामांमुळे मिळाली आहे. कलाकार आपलं दिसणं किंवा इमेज कायमच जपतता. परंतु रजनीकांत कदाचित एकमेव अभिनेते असतील, जे बाहेरच्या जगात आपल्या खऱ्याच रुपात वावरतात.
सिक्सर किंग युवराज सिंहचा आज 38वा वाढदिवस आहे. 12 डिसेंबर 1981 रोजी चंदीगडमध्ये जन्मलेल्या युवराजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही लोकांच्या हृदयातलं त्याचं स्थान अजूनही कायम आहे. त्याने भारतीय संघाला असे काही क्षण दिले आहे जे कायमस्वरूपी सोन्याच्या अक्षरात कैद झाले आहेत. 2007 मध्ये क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या टी-20 विश्वचषकमध्ये युवीने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सहा षटकार ठोकले आणि अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आजवर जागतिक क्रिकेटमध्ये युवीचा हा विक्रम कोणताही फलंदाज मोडू शकलेला नाही.
क्रिकेट सामना असो वा कर्करोगाविरुद्ध लढा, युवी फक्त विजयी म्हणून परतला आहे. 2011 वर्ल्ड कप दरम्यानयुवराज कर्करोगाचे निदान झाल्याचं समजलं. हे जाणून युवी खचून गेला नाही, त्याने केवळ त्या कर्करोगाशीच लढा दिला नाही तर टीम इंडियामध्येही पुनरागमन केलं. 2011 च्या क्रिकेट विश्वचषकाचा तो हिरो होता.
12 डिसेंबर हा गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महान नेता जो बीड जिल्ह्याचा सुपुत्र, ज्यांनी तब्बल 35 वर्षे जिल्ह्याचं नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपसाठी आयुष्य वेचलं. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे महाराष्ट्राच्या राजकारणातील शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार होते.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र आपल्या माणसांचा सत्कार स्वीकारण्यासाठी महाराष्ट्रात येत असताना 3 जून 2014 रोजी त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यातच गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -