मुंबई-पुण्याजवळील पावसाळ्यात फुलणारे 10 प्रसिद्ध पर्यटनस्थळं
भंडारदरा : आर्थर लेक अशी ओळख असणारं भंडारदरा हे धरण पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. येथील शुद्ध हवा, झाडे आणि मनाला प्रसन्न करणारं वातावरण पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंहगड : पुण्यापासून 25 किलोमीटरवर असणारं सिंहगड हे पर्यटनस्थळ पुणेकरांचं आवडतं ठिकाण आहे. सिंहगडावरील नैसर्गिक वातावरण, खाद्यपदार्थ पर्यटकांना आकर्षित करतात.
शहापूरः ठाणे जिल्ह्यातील शहापूर हे विविध प्रसिद्ध पर्यटनस्थळं असणारं ठिकाण आहे. शहापूर येथील धबधबे, हिरवळ हे पावसाळ्यात पाहण्यासारखं असतं.
पळस दरी-खोपोली : येथील डोंगरावर पसरलेली हिरवळीची झालर आणि मनसोक्त वाहणारे धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत.
मुळशी धरण : मुळा नदीवरील मुळशी धरण हे पुणेकरांचं आवडतं पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यातील येथील शांतता, हिरवं वातावरण, विविध पक्ष्यांचा वावर हे अनुभवण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी असते.
माथेरान : पावसाळ्यात माथेरानचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं असतं. माथेरान पावसाळ्यात खास ट्रेकिंगसाठी ओळखलं जातं.
माळशेज घाट : कल्याण-अहमदनगर मार्ग : धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेला माळशेज घाट पावसाळ्यात आकर्षक फुलतो. येथे येणारे परदेशी पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची पावसाळ्यात मोठी गर्दी असते.
राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर नैसर्गिक पर्यटनस्थळं चांगलीच फुलली आहेत. त्यामुळे तुम्ही मुंबई किंवा पुण्यात राहत असाल तर कमी वेळेत चांगली पिकनिक करण्यासाठी अगदी हाकेच्या अंतरावर काही सुंदर पर्यटनस्थळं आहेत.
कान्हेरी- बोरिवली : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशेजारील कान्हेरी लेणी हे मुंबईकरांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. विशेषतः तरुणाईचा इथे जास्त वावर असतो.
लोहगड किल्ला : पुण्यात राहणाऱ्यांसाठी लोणावळ्याजवळील लोहगड हे निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाण एक पर्वणी आहे. शिवाय मुंबईकरांसाठी देखील हे ठिकाण सोयीचं आहे. रस्त्याने तुम्ही लोणावळ्यातील विविध पर्यटनस्थळांवर जाऊ शकता.
कोंडेश्वर धबधबा-बदलापूर : बदलापूर स्थानकाच्या पूर्वेला 15 किलोमीटरवर कोंडेश्वर धबधबा हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे गणपती आणि शंकराचे मंदिरही आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -