Birth Anniversary : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे दहा प्रेरणादायी विचार
तुमची सही ज्या दिवशी ऑटोग्राफमध्ये बदलेल, त्यादिवशी तुम्ही समजून जा, की तुम्ही यशस्वी झालात!
जर तुम्हाला सूर्याइतकं तेजस्वी व्हायचं असेल तर त्याआधी तुम्हाला त्याच्याइतकं जळावं लागेल
एक चांगलं पुस्तक हजार मित्रांइतकं असतं आणि एक चांगला मित्र एका ग्रंथालयाइतका मोठा असतो, त्यामुळे आयुष्यात चांगले मित्र बनवा
चिमण्यांसह इतर पक्षी पावसात आसरा शोधू लागतात, मात्र गरुड हा असा पक्षी आहे जो पावसात ढगांपेक्षाही उंच उडतो, संकटसमयी तुम्हीदेखील गरुडाचं अनुसरण करा
स्वप्नं तेव्हा खरी होतात, जेव्हा आपण ती पाहायला सुरुवात करु
सुखाची किंमत तेव्हा कळते, जेव्हा त्यासाठी आपण खूप मेहनत केलेली असते
वाट पाहणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेलं असतं
देशातली सर्वात बुद्धिमान व्यक्ती कदाचित वर्गातल्या शेवटच्या बाकावर बसलेली असू शकते
विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला हवेत, तो त्यांचा सर्वोत्तम गुण आहे
तुम्ही झोपल्यानंतर पाहता ती स्वप्नं नसतात, स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत