एकाच वेळी दहा सापांना जीवदान

कल्याण आणि आसपासच्या परिसरातून काही दिवसांपूर्वी 8 नाग (कोब्रा) 2 घोणस आणि 2 धामण पकडण्यात आल्या होत्या. हे सर्व साप त्यांनी अग्निशमन दलाच्या एका खोलीत सुरक्षित ठेवले होते. त्यानंतर काल (रविवारी) या सर्व सापांना वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्पमित्रांनी जंगलात सोडलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तब्बल 8 नागांना सर्पमित्रांनी जीवदान दिलं.

गेल्या अनेक वर्षापासून कल्याणमधील सर्पमित्र दत्ता बोंबे हे तंत्रशुद्ध पद्धतीनं सापांना पकडून त्यांचे जीव वाचण्याचं काम करतात.
यावेळी वनपाल अधिकारी मुरलीधर जगकर यांच्या उपस्थितीत सर्पमित्र दत्ता बोंबे आणि हितेश यांनी तब्बल 10 विषारी साप जंगलात सोडले.
अनेकदा उत्साही सर्पमित्र हे कोणत्याही साहित्याशिवाय विषारी साप पकडण्याचं धाडस करतात. त्यामुळे आतापर्यंत काही जणांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. त्यामुळे सर्पमित्र बोंबे हे तरुणांना शास्त्रशुद्ध साप पकडण्याचं प्रशिक्षणही देतात.
साप पाहिल्यानंतर अनेकांची भंबेरी उडते. बऱ्याचदा काहीजण सापला मारण्याचाही प्रयत्न करतात. पण याचवेळी नागरी वस्तीत शिरलेले विषारी आणि बिनविषारी साप पकडून त्यांचा जीव वाचवणारे सर्पमित्रही आता समोर आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -