भाजप कार्यकारिणीच्या बैठकीशी संबंधित महत्त्वाचे 10 मुद्दे
१०. विशेष म्हणजे कालच्या अध्यक्षीय भाषणात....मोदींना सौदी अरेबिया,अफगाणिस्तान या दोन इस्लामिक राष्ट्रांनी त्यांचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान केल्याचंही ठळकपणे सांगितलं
९. केंद्रीय मंञिमंडळ विस्तार आणि पक्ष संघटनेतले बदल या. दृष्टीनंही कार्यकारिणीत खलबतं.. लवकरच त्यासंदर्भात घोषणांची शक्यता
1. गंगा- यमुनेच्या संगमावर भाजपचं उत्तरप्रदेशच्या निवडणुकांसाठी महामंथन, अलाहाबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस, कार्यकारिणी ,संपल्यानंतर संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान मोदींची जाहीर सभा उत्तरप्रदेशच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार
८. गांधी- नेहरू परिवाराचं आनंदभवन हे निवासस्थान अलाहाबादमध्येच.. काँग्रेसचं या शहराशी ऐतिहासिक नातं...माञ त्याच ठिकाणी कार्यकारिणी आयोजित करून भाजपचा काँग्रेसला शह
७. भाजपची स्थापना झाल्यापासून म्हणजे तीन दशकानंतर पहिल्यांदाच अलाहाबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक..
६. अमित शहांच्या अध्यक्षीय भाषणानं कार्यकारिणीची सुरूवात, काँग्रेसच्या काळात ग्रामीण विकास की शहरी विकास, आर्थिक सुधारणांसाठी कडक निर्णयव्हावेत की सामाजिक सुधारणा, सरकार नेत्यांनी चालवायचं की नोकरशहांनी याबद्दल संभ्रम होता....भाजपनं ही द्विधा मनस्थिती संपवल्याचा दावा
५. ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा पुन्हा मानभंग, कार्यकारिणीच्या व्यासपीठावर मोदी अमित शहा, अरूण जेटली, संघटन मंञी रामलाल हेच व्यासपीठावर...जेटली हे ज्येष्ठतेनं 'ज्युनिअर असूनही व्यासपीठावर
४. पंतप्रधान मोदींनी काल कार्यकारिणीच्या बैठकीला केलं संबोधित, उत्तर प्रदेशात लोकसभेला मिळालेलं अवाढव्य जनमत प्राणपणानं जपा असा संदेश
३. एकनाथ खडसे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असूनही बैठकीला अनुपस्थित. वादाच्या पार्श्वभूमीवर खडसेंना पक्षानं दूर ठेवल्याची चर्चा
२. कार्यकारिणीच्या निमित्तानं संपूर्ण अलाहाबाद शहर पोस्टर्सनं भरून गेलंय. सर्वाधिक पोस्टर वरुण गांधींचे. माञ काल रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं, की कार्यकारिणीच्या बैठकीत यूपीसाठी मुख्यमंञिपदाचा उमेदवार जाहीर होणार नाही, संसदीय बोर्ड त्याबद्दल निर्णय घेईल.